Marathi sayings or idioms and their meaning
This is meant more for the Non resident Indian settled abroad, who wants some nostalgic memories and caustic pungent flavors of his rustic language. Maybe to pass on to his next generation.. as antique colloquialisms !
I have tried to give the explanation of these sayings in simple marathi for better understanding .
१३० मराठी म्हणी !
I) घर भर रंभा आणि पाण्याचा नाही थेंबा
House full of beautiful damsels but not a drop of water…
Expanded meaning .. A beautiful person is so much obsessed with their own beauty that they are of no use for household work !
सुंदर व्यक्ति काही कामाच्या नसतात , त्या स्वत: च्याच सौंदर्यात रम़ माण असतात
II ) कर कर करावे अन शिव्या खाऊन मरावे
You are not to question why, you are just to do and die !
Expect criticism for whatever you do , no matter how hard you try to excel
किती ही काम केले तरी त्यात चुका शोधून दोष व ओरडा मिळणे
III ) घरचे झालेय थोडे अन् व्यहांनी पाठवले घोडे
Our house work was scarce , so the in laws sent us a horse to tend .
( sarcasm )
We were already over worked with our own daily chores when the in laws ( or a superior authority ) burdened us with their own special tasks !
आधीच घरचे व्याप भरपूर होते, त्यात मालकाने आणखी काम दिले
IV) बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी
The product is still in the market and the husband is beating his wife over how to use it .
Arguing or quarelling over a non existing thing or which is not really immediately affecting you
एखादी गोष्ट घडायच्या आधी तीच्या वरून उगाच तंटा वाद करणे
V) दुष्काळात तेरावा महिना
Thirteen months in an year of famine
Hard times get extended just when we are hoping they would be over
क्लेश दायक काळ अपेक्षे पेक्षा अधिक लांबणे
VI) कसले काय अन् फाटक्यात पाय
High hopes dashed by a torn blanket
किती ही प्रयत्न केले तरी अपयशच मिळणे
VII) कुजक्या तोंडाची अन फाटक्या पायाची
She not only is foul mouthed, but also ill omened
ती नुसती कडू बोलते हेच अवगूण कमी नवहते, वर तीचा पायगुण देखील अशुभ आहे
VIII) काम ना धाम अन भुईला भार … खायला काळ अन भुईला भार , …. खायला आधी झोपायला मधी अन कामाला कधी मधी
आळशी खादाड लबाड स्वार्थी व्रुत्तिचा व्यक्ति
Of no use but a burden on earth
IX ) कप बशी फुटली अन थोडक्यात हौस फिटली
The cup and saucer broke and they cancelled the great tomtommed event
A great expensive event cancelled due to a minor loss
एखादा मोठा सोहळा किंवा प्रकल्प छोट्या श्या नुकसानी मुळे रद्द करणे
X ) करून करून थकले अन देव पुजेला लागले
इतर सारे इलाज करून थकली अन अखेरीस सन्मार्गाला लागली
११) मोठा वाडा अन् पोकळ वासा
Big house with hollow wooden beams
A big rich house may really just have outward show and in debt to its last penny
मोठा बढेजाव दाखवणारे आतुन कफल्लक असतात
१२) मोठे कुले अन् जग भूले
Big buttocks sway the world
Explanation self censored !
१३) कुठली कोण अन् बिळातली घोण
God knows her origins, may be just a centipede !
A lowly person trying to get over familiar or showing great affection
उगाच जवळीक साधू पाहणारी अपाञ अनोळखी व्यक्ति
१४) म्हातारा नवरा अन कुंकवाला आधार
An aged husband is of no use but at least he is an excuse for the wife to adorn and decorate herself.
An antique useless thing may be useful for outward show
एखाद्या वस्तूची किंमत नुसती बाहेरून दिसते तेवढीच नसते
१५) म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो
No tears are shed on the old woman’s death, but having tasted an easy victim, Death may get greedy.
A villain may get bolder to do more harm if his first attack is even meagrely successful
वाईट छोटी घटना घडली तरी बेसावध राहू नये . ती मोठ्या संकटाला आमंञण देते
१६) खायला कोंडा अन झोपायला धोंडा
Husk to eat and a stone to sleep
फार हल्लाकी तून दिवस काढणे
१७) रडगाणे अवरेना अन नवर्या वाचुन करमेना
She is missing her husband which is the real cause of all her complaints and ills
तीच्या सर्व दु:खण्यांचे मूळ कारण पती वियोग आहे
१८) विहिण बाई लई गुणाची माणिक मोत्यां ची
My daughter’s mother in law is so sweet natured and dear to me asa precious gem
Flattering a fiend for obvious reasons
१९) सुसर बाई तुझी पाठ किती मऊ
O crocodile, your back is so soft and tender! Please ferry me across the river
Flattering and praising even the bad points of someone may be the only way to get your work done
ज्च्याच्या कडून काम करून घ्यायचे असेल त्याच्या दोषां कडे दुर्लक्ष करून खोटी स्तुती करणे
२०) असेल माझा हरी तर देईल खाटल्या वरी
If my God exists, he will care for me even if I laze around in bed
२१) आंधळ्याच्या गाई देव राखतो
God takes care of the blind man’s cattle
२२) तळे राखी तो पाणी चाखी
राखणदाराला देखील राखत असलेल्या गोष्टीचा मोह होतो
One who guards the pond will definitely drink from it
You can protect everything from outsiders but not from its very watchmen .
२३) मी नाही त्यातली पण कडी लाव आतली
I am not that type of girl…but please shut the door tightly from inside..
Explanation left to readers imagination
उगाच सोज्वळ सात्विक पणाचे ढोंग करणे पण संधी मिळताच खरे चावट मनोगत पूर्ण करणे
२४) माकडाच्या हाती कोलीत
अर्धवट माणसाच्या हाती सत्ता अथवा एखादी खतरनाक वस्तु देणे
A burning torch in the hands of a monkey
२५) आधीच मर्कट, त्यातुन मद्य प्याला
As it is he is a monkey by nature .. And to make matters worse, he drank liquor
वाञट माणसाने मद्य प्यायल्यावर होणारा अनर्थ
वाञट व्यक्तिला अधिक प्रोत्साहन मिळणे
२६) टाकशील शिते तर जमतील भुते
देणारे असले तर घेणारे मिळणारच
अती दानशूर पणा वाइट अथवा अपाञ दान ठरतो
जर काही फायद्याचे आढळले, तर त्या गोष्टीचा फायदा घेणारी लोके लगेच जमतील
Where left over crumbs do remain, there at once will hungry ghosts gather
२७) किती बाई देखणी शूर्पणखा जशी
She is so beautiful, just like Shurpankha
( Shurpankha was a hideous demoness )
Flattery laced with Sarcasm
एखाद्या स्ञिच्या सौंदर्याचे उपरोधक वर्णन करणे
२८) जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही
काही वाईट सवया आपल्याला जन्मभर पुरतात
Some bad habits follow us upto the grave
२९) सुंभ जळेल पण पिळ काही जाणार नाही
He will break but will not bend
३०) नावडतीच्या हातचे मिठ पण आळणी
एखाद्या अप्रिय व्यक्तिच्या हातची वा केलेली कोणती ही गोष्ट रूचकर वा बरोबर वाटत नाही ..अर्थात आवड आपल्या जिभेवर नसून मना वर अवलंबून असते
Even the salt is tasteless when given by the unloved wife.
३१) स्वत:चे झाकून पण दुसर्याचे वाकून
To be most curious and inquisitive about other people’s affairs, but very secretive and silent about our own affairs
स्वत: ची क्रुत्ये लपवून ठेवणे पण दुसर्यांची खोदुन चौकशी करणे
३२) मालक उपाशी अन पाहुणे तुपाशी
The owner remains hungry while the guests are fed ghee
३३) मालकाचे हाल अन चोरट्यांचे गाल लाल
एखाद्या चा परक्यांनी भरपूर फायदा घेणे
The owner is starving While thieves have rosy cheeks
३४) तात साहीना अन लग्न होईना
घरचे पण आसरा देईना अन बाहेरून पण मदत मिळेना
३५) चोराच्या उलट्या बोंबा .
चोर तो चोर अन वर क्षिर जोर
चोर चोरी करून भित नाहीच, वर धाक दाखवतो किंवा मालकालाच दोषी ठरवतो
३६) चोराच्या मनात चांदणे … … खाई त्याला खव खवे
दुष्क्रुत्य केलेल्या व्यक्ति ला त्याचे मन टोचत असते , व चित्त अस्वस्थ करते
चोरा ला केलेल्या कर्माचे मनात का होईना दोषी वाटणे
३७) बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
निर अपराधी असल्याचा पुरावा दाखव नाही तर केलेल्या कर्माची शिक्षा घे
३८) एक ना धड भाराभार चिंध्या
एक काम नीट पूर्ण न करता आणखी कामे हाती घेऊन सगळी कामे अर्धवट ठेवणे
Making a mess of multiple jobs when tackled together . It’s fashionably called multitasking today .
३९) चिंध्या वेचलेल्या अन गोदड्या शिवलेल्या
( Collage ) छोटी छोटी कामे करून त्यांना एकञ करून मोठे काम पार पाडणे
४०) गावात लग्न अन कुञ्यांची हडबड
दुसर्याच्या सोहोळ्यात भलत्याच लोकांनी फायदा बघून क्रियाशील होणे
४१) कुर्हाडीचा दांडा अन गोत्यास काळ
आपलीच प्रिय व्यक्ति आपली वैरी होणे
४२) गाय आली व्यायला अन बाई गेली दुध काढायला
कोणी स्वत:च्या कामात गडबडीत असताना दुसर्याने ञास दिला तर ओरडा किंवा मार मिळणे
४३ ) रोज मरे त्याला कोण रडे
रोजच जो दु:ख करत बसतो त्याला फार काळ लोकांची सहानुभूती मिळत नाही
४४ ) तळ्यात राहुन माश्यांशी वैर धरू नये
जिथे राहतो अथवा ज्यांच्याशी रोज संबंध येतो तिथे सर्वांशी भांडून चालत नाही
४५) लाखां शिवाय बात नाही अन वडा पाव शिवाय खात नाही
उगाच खोट्या गमजा मारणे , कुवत नसताना मोठ्या बाता करणे
४६ ) भिडे भिडे पण पोट वाढे
अबोल किंवा अती लाजरा भिडस्त स्वभाव असला तर स्वत: चे नुकसान होते
४७ ) अती तिथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये
४८) काखेत कळसा अन गावाला वळसा …..
बोचा पाशी आरी अन चांभार पोरांना मारी
स्वत: जवळ असलेली गोष्ट अथवा वस्तु हरवलेली समजून गाव भर शोधणे वा दुसर्याला दोष देणे
४९) हातच्या कंकणाला अरसा कशाला ?
उघड पणे दिसणार्या गोष्टीला इतर पुरावे नको
५०) ऊथळ पाण्याला खळखळ फार ……
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
तुटपुंजे न्यान असलेल्या व्यक्तिला उगाच गर्व असतो व मिरवायला आवडते
५१) कानात नाही कुडी अन म्हणे चंद्रावरती स्वारी
झेपत नाही अशा गोष्टीं चा गमजा मारू नये
५२) ज्याचे जळे त्याला कळे …… पर दु:खे शितल
आपले दु:ख आपल्या लाच माहीत , दुसर्याना त्याची तीव्रता कळत नाही
५३) गाढवाला गुळाची चव काय ….. डुकराला राजमहाला पेक्षा म्हशी चा गोठा प्रिय
५४) वासरात लंगडी गाय शहाणी
मुलां मध्ये तुटपुंज्या न्याना चा वयस्कर व्यक्ति हुशार समजला जातो
५५) खविसाला मिळाली बायको अन हडळी ला मिळाला नवरा
दोन दुष्ट प्रव्रूत्तिच्या व्यक्ति ना एक मेकांची साथ मिळणे
५६) शेरास शेर ….. ठकास महा ठक
दुष्ट अथवा कपटी प्रव्रुत्तिच्या व्यक्ति ला त्या च्या हुन अधिक लबाड व्यक्ति ने धडा शिकवणे
५७) ताकाला जाता तर भांडे का लपवता ?
याचकाला लाज व अभिमान ठेवून चालत नाही
५८) नका नका म्हणा अन पायली भर आंबिळ चाखा
नको नको म्हणत उलट तीच वस्तु भरपूर घेणे अथवा खाणे
५९) देव तारी त्याला कोण मारी
देवाच्या भक्ताला कोणीही मारू शकत नाही
६०) अंधळ्याच्या गाया देव राखतो
भोळ्या असहाय्य व्यक्ति ची काळजी देव घेतो
६१) काना मागुन आली अन तिखट झाली
आपला सेवक आपल्याहुन श्रेष्ठ पदी पोहोचणे
६२) साखरेचे खाई त्याला देव देई
चांगल्या प्रसन्न चित्त व्यक्ति ला देव सुखात ठेवतो
६३) भिक नको पण कुञा आवर
याचकाला मदत करायची सोडून उलट ञास देणे वा अपमानीत करणे
६४) जावय नाही आपला, अन दिर म्हणु नये धाकला
जावय अन दिराला ऩेहमी मान द्यावा . अधिक जवळिक बरी नव्हे
६५) पिकते तिथे विकत नाही
जिथे आपण जनमतो अथवा बालपण घालवतो तिथे आपला मोठेपणा माहीत नसतो
६६) उताविळ नवरा अन गुडघ्याला बाशिंग
उताविळ आसक्त झालेली व्यक्ति ईच्छा पूर्ति साठी काहीही करायला तयार असतो
६७) थांब टकल्या भांग पाडतो
घाई केली नाही तर अशक्य काम पण करून दाखविन
६८) पदरात पडले अन पावन झाले
कितीही नालायक असली तरी आपल्या जवळच्या नात्यांना चांगलेच म्हणणे
६९) आपलेच दात अन आपलेच ओठ
आपल्याच जवळ च्या व्यक्तिं मुळे होणारा ञास किंवा नुकसान
७०) नाका पेक्षा मोता जड
पेलवणार अथवा परवडणार नाही अशी वस्तू मिरवायला आणणे
७१) मेलेल्या म्हशी चे पाच शेर दुध
एखाद्या गेलेल्या अथवा मेलेल्या वस्तु वा व्यक्ति चे अती कौतुक करत बसणे
७२) दुध नाही देत, पण शेण तर देते
एखाद्या कमकुवत गोष्टीं अथवा वस्तु चे तीच्या इतर गुणां साठी समर्थन वा कौतुक करणे
७३) शुभ बोल नार्या तर म्हणे मांडवाला लागली आग
एखाद्या च्या मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे
७४) माय मरो अन मावशी जगो
आपल्या जन्मदात्या आई ला विसरून दुसरी कडून आईचे प्रेम मिळावे
७५) गरज सरो अन वैद्य मरो
एखाद्या ची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये
७६) गुरूची विद्या गुरूलाच भोवली
आपलाच शहाणपणा आपल्यालाच नडणे
७७) पांघरूण बघून पाय पसरावे
मिळकती च्या जास्त खर्च करू नये
७८) नकटी च्या लग्नाला सञाशे साठ विघ्ने
एखाद्या कार्यास अनेक विघ्ने येणे
७९) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये
धाकटे होणे म्हणजे सगळ्यांचा जाच निमुट सोसणे
८०) पावसाने भिजवले अन नवर्याने झोडपले तर सांगणार कोणाला ?
काही अन्याय , दु:ख , अथवा गार्हाणी कोणालाच सांगता येत नाही
८१) आधिच ऊल्हास अन त्यातुन फालगुन मास
हौशी व्यक्ति ला सण अथवा सोहोळ्याचे निमित्त मिळाले कि अधिकच उधाण येणे
८२) जावय बापू वैद्य अन अवघड जागेचे दुखणे
काही अवघड दुखण्यांचा इलाज घरी औषध असले तरी ही बाहेरून करून घेणे योग्य ठरते
८३) पादर्याला पावट्याचे निमित्त
कुजक्या मनोव्रुत्तिच्या व्यक्ति ला कुजके पणा साठी कोणतेही निमित्त चालते
८४) सारे उलथ्या घड्यावर पाणी
कितीही श्रम वा इलाज वा उपदेश केला तरी काही परीणाम नाही
८५) सावलीने पोळेल अन फुंकरी ने मरेल
नाजुक प्रक्रुती ची व्यक्ति
८६) गाडग्या बरोबर नळाची याञा
मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ति बरोबर छोट्या व्यक्ति ला फायदा मिळणे
८७) सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी ह्यांची थोरवी
एखाद्या व्यक्ति ची दुश क्रुत्ये जगाला समजणे
८८) जगा सांगे तत्वन्यान , स्वत: कोरडा पाषाण
लोकांना उपदेश देणारा स्वत: तसा वागत नाही
८९) सरड्याची धाव कुंपणा पर्यंत
काही माणसे ठराविक जवळच्या जागेतच आश्रय घेणार
९०) आयजीच्या जिवावर बायजी उदार
दुसर्याच्या पैशाने दान धर्म अथवा खर्च करणे
९१) गाढव मेले ओझ्याने अन शिंगरू मेले हेलपाट्या ने
मोठी आणि छोटी , सर्वच माणसे कामाने थकुन जाणे वा हैराण होणे
९२) काकडी नाही किसायला अन भाकरी नाही भाजायला
वस्तु असल्या तरी इतर सामग्री गरीबी मुळे नसणे
९३) कळकट कोळसा अन भरकटलेला मुलगा सापडायचा कसा ?
कोळसा मुळातच काळा अन ऊन्नाड मुलाचा ठाव ठिकाणा मिळणे कठिण
९४) सुंठी वाचून खोकला गेला
इलाज न करता परीस्थितीत सुधारणा होणे
९५) आली अंगावर तर घेतली शिंगावर
एकदम आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे
९६) अंबा लावला कोणी अन विठू झाला धनी
एखाद्या च्या श्रमाचा फायदा दुसर्यालाच मिळणे
९७) पाहुण्याच्या हातून साप मारणे ….. आला भेटीला अन धरला वेठीला
आलेल्या पाहुण्याच्या हातून अवघड काम करून घेणे
९८) राव गेले अन पंत आले
मालक बदल ला तरी परीस्थितीत काही बदल नाही
९९) नावाजली गुरविण हगली देवळात
नावाजलेल्या व्यक्ति ने सर्वांच्या समोर लाजिरवाणे क्रुत्य करणे
१००) झाकली मुठ सव्वा लाखाची
स्वत: ची पत सर्वां समोर उघड केली नाही तर अधिक मान मिळेल
१०१) झिजावे आम्ही अन मिरवावे तुम्ही ….. आयत्या बिळावर नागोबा
एखाद्या च्या श्रमाचा फायदा , शाबासकी, कौतुक दुसर्याने घेणे
१०२) धरलं तर चावतं अन सोडलं तर पळतं
जवळ केलं तरी ञास अन दूर केलं तरी नुकसान
१०३) घर बघावे बांधून अन लग्न पहावे करून
दोन्ही कर्म आपल्यातील सर्व गुणांची परीक्षा व कस पाहतात
१०४) मिनीटाची फुर्सत नाही अन दिडकीची कमाई नाही
काम भरपूर करणे पण आर्थिक कमाई नसणे
१०५) स्वत: चे पोरटे अन दुसर्याचे कारटे
स्वत: च्या मुलाचे कौतुक करणे पणदुसर्याच्याे पोराची नालस्ती, निंदा अथवा द्वेष करणे
१०६) मांजराला साक्ष उंदराची
गुन्हेगारा चा सााक्षीदारा वर दबाव अथवा धाक असणे
१०७) एक वेळ कळ सोसून विहीर उपसावी पण धाकली नणंद नकटी नसावी
नकटी धाकटी नणंद असली तर तीचे लग्न लवकर न झाल्या मुळे ञास व छळ होणारच
१०८) सांगुन पटेना अन ऐकून भागेना , तर विचार ता कशाला ?
जर सांगितलेले पटत नाही तर उगाच प्रश्ण विचारून बोलायला का लावता
१०९) रितीचं सांगितलं तर भिंतीला गेलं
नितीचे अथवा चांगले सांगितले तर त्याचे ऐकणार्याने दुर्लक्ष करणे
११०) भुकेल्याला सुवासाच्या वाकुल्या
एखाद्या च्या दु:खाची अथवा वाइट परीस्थिती ची चेष्टा करणे
१११) रखैल रडली अऩ बायको हसली
वाइटा ची हार व सत्त्याचा विजय होणे
११२) कानाची पाळ अन पोटाची नाळ वाढवावी तेवढी वाढते
लोभाला व आधाशी पणाला अंत नाही
११३) गोगलगाय अन पोटात पाय
इतरांना कळु न देता स्वत: चा हळुहळु फायदा करून घेणारी व्यक्ति
११४) ज्याचे करावे भले , तो म्हणे माझेच खरे !
दुसर्याचे भले करायला जावे अन त्याने आपल्यालाच वेड्यात काढणे
११५) लष्कराच्या भाकरीला वर्ष भराचे सरण
उगाच दानशूर पणा दाखवायला गेलात तर नुकसान होते
११६) तेल गेलं तुप गेलं हाती राहिलं धुपाटणं
सगळ्या गोष्टीत स्वत: च्या मुर्खपणा मुळे नुकसान होणे
११७) खरे कधी बोलु नये अन खोटे कधी सांगू नये
खरे सांगुन मने दुखवतात पण खोटे सांगून पाप ओढवू नये
११८) भित्या पाठी ब्रम्ह राक्षस
जास्त भिती किंवा काळजी केली तर ती घटना आपणच ओढवून घेतो
११९) देव दर्शन देईना अन रावण पळवुन नेईना
आयुष्यात काहीच चांगले अथवा वाइट घडत नाही ,… सर्व जैसे थे
१२०) दुरून डोंगर साजरे , जवळुन पहावे तर काजवे …… द्रुष्टी आड स्रुष्टी
एखादी गोष्ट दुरून छान दिसत असली तरी जवळून पाहिल्यावर तिचे दोष उघडकीस येतात
१२१) लेक माझा नवसाचा , सर्व गुण संपन्न कांचन मणी ….. लेक माझी नवसाची , अखुड शिंगी बहु दुधी गरीब गाय
ऊत्तम लग्नाला योग्य मुलगा / मुलगी
१२२) पी हळद अन हो गोरी
काही औषधे व इलाज असर करण्यास वेळ घेतात ..झटपट परीणामा ची अपेक्षा करू नये
१२३) खाली मुंडी अन पाताळ धुंडी
दाखवायला सोजवळ पण मनातून नीच
१२४) नाचता येईना म्हणे आंगण वाकडे
आपल्या कमकुवत पणाचा दोष परीस्थिती अथवा औजारांना देणे
१२५) चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा मसाला
एखादी साधी स्वस्त वस्तू असेल तर तीला सुधारण्यात जास्त खर्च करू नये
१२६) कोंबडा झाकला महणून सूर्य उगवायचा थांबत नाही
पुरावा लपवला तरी सत्य लपत नाही
१२७) असेल माती मऊ तर कोपर्याने खणली जाऊ
नरम ह्रुदयाच्या माणसाचा सगळे गैर फायदा घेतात
१२८) चांभाराच्या देवाला खेटराची पूजा ….जसा राजा तशी प्रजा
प्रत्येकाला आपल्या योग्यते प्रमाणे फळ अथवा स्थान मिळते
१२९ ) डुकरा च्या धन्या ला गाढवाचे कौतुक
प्रत्येकाला आपल्या पेेक्षा एक पायरी मोठा असलेल्या व्यक्ति वा गोष्टी चे कौतुक असते
१३०) अष्टकोनी वाटोळे
इतके वाटोळे की त्यातून सुटका कठिण !
free ! Free ! FREE ! Latest bumper offer !
As a bonus for having read ( scrolled down without reading ) so many idioms, I give below some old Marathi puzzles or riddles from my grandmother’s time … Most of the answers are redundant because the young generation has not seen such items or equipment ! But for old times and my grandmother’s sake…
1 ) Saata samudra palikade Sita ne kelaa bhaat … Bhaande khalle, aatla bhaat takun dilaa … Uttar…..Khaarik
साता समुद्रा पलि कडे सिता ने केला भात , भांडे खाल्ले, आतला भात फेकुन दिला ऊत्तर : खारीक
२) साता समुद्रा पलि कडे रामा ने लावल्या केळी , हलतात पण मोडत नाहीत ऊत्तर : हाताची बोटे
Saata samudra pali kade Raama ne laavlya keli, haltaat pun modat naahit.
Answer : hand fingers
Uttar : hataa chi bote
3) Soop bhar kanya , tulaa naahi mojvat, malaa naahi mojvat
Uttar : Chaandanya
सुप भर कण्या , तुला नाही मोजवत, मला नाही मोजवत : ऊत्तर : चांदण्या
४) एवढेसे पोर, पण घर राखण्यात थोर
ऊत्तर : कुलुप
Evdhese por pun ghar raakhnyat thor.
Uttar : kulup
5) Evdhese por pun maar khanyat Thor
Uttar : taandul sadne
एवढेसे पोर पण मार खाण्यात थोर
ऊत्तर : तांदुळ सडणे
६) चंद्र सुर्य शेजारी , पण भेट नाही संसारी
ऊत्तर : डोळे
७) बत्तिस चिरे, त्यात नागीण फिरे
ऊत्तर : जिभ ( tongue)
८) लाल पालखी हिरवा दांडा, आत मध्ये बसल्या बोडक्या रांडा
ऊत्तर : लाल मिरची अन बिया
९) काळी काळु बाई , हिरवी लाजू बाई , पांढरा आजोबा, बोडकी आत्या बाई
ऊत्तर : पान पट्टी । विडा
काळु बाई : कात, लाजू बाई : पान, आजोबा : चुना, आत्या बाई : सुपारी
१०) एवढीशी बीबी चुल्या शी उभी
ऊत्तर : फूंकणी
११) तार तार तार शी डोळ्या पुढे आरशी , माझा उखाणा झिंकशील तर घटकेत मरशील
ऊत्तर : झोप
१२) सर सर जातो साप नव्हे, गर गर जातो गाडा नव्हे , नव्हे ईंद्र , नव्हे चंद्र , नव्हे जळी चा मासा , वेड्याने घातला ऊखाणा, शहाण्याला पडला फासा?
ऊत्तर : विहीरीतले पाणी ओढण्याचे रहाट
१३) तीन पायांची ञिंबक राणी, खाते लाकुड पिते पाणि
ऊत्तर : सहाण
१४) हरीण पळते, दुध गळते , ओळखा पाहू ?
ऊत्तर : दळण्याचे जाते ( पीठ पडते )
१५) अग्गर नाचे, टग्गर नाचे , टगरी चे फुल नाचे, फूल नाचे , बाबू नाचे, बाबू ची शेंडी नाचे
ऊत्तर : ताक घुसळण्याची रवी
हूश्श ! संपले एकदाचे ! धन्यवाद !
Typing Marathi font is a Herculean task ! So I congratulate myself !